16 October 2019

News Flash

मोदी सर्वसामान्यांचे ‘चौकीदार’ नाहीत; पुण्यातल्या सुरक्षा रक्षकाने व्यक्त केली नाराजी

'चौकीदार चोर है' या घोषणेद्वारे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाने 'मै भी चौकीदार' ही मोहिमच राबवली.

पंतप्रधान मोदी साहेब तुम्ही तर अंबानी, अदाणी, मल्ल्या, नीरव मोदीचे चौकीदार आहात सर्वसामान्य नागरिकांचे नाही, अशा शब्दांत पुण्यातील एका खऱ्याखुऱ्या चौकीदाराने (सुरक्षा रक्षक) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मोहम्मद इस्माईल शेख असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै भी चौकीदार’ या घोषणेवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, खरा चौकीदार काय काम करतो हे तुम्हाला माहिती नाही, त्या चौकीदाराप्रमाणे किमान बारा तास काम करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल, असे थेट आव्हानही त्यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे.

देशात झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध अभियान चालवण्यात आले. यातील एक ‘मै भी चौकीदार’ हे अभियान आहे. ‘चौकीदार चोर है’ या घोषणेद्वारे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाने ‘मै भी चौकीदार’ ही मोहिमच राबवली. मात्र, या मोहिमेवर पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे मोहम्मद इस्माईल शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘मै भी चौकीदार’ या मोहिमेच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोदी समर्थक आणि विरोधकांकडून चौकीदार या शब्दाचा अक्षरशः तमाशा मांडला. खऱ्या चौकीदाराबाबत सर्व सामान्यांमधील या चर्चा ऐकूण वाईट वाटते, असे शेख यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश देताना ते म्हणतात, मोदीसाहेब तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचे चौकीदार नाहीत तर अंबानी, अदाणी, मल्ल्या, नीरव मोदी यांचे चौकीदार आहात. तुम्हाला खरा चौकीदार काय काम करतो हे माहिती नाही. तुम्ही एकदा खऱ्याखुऱ्या चौकीदाराचे काम करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. दरम्यान, पुण्यात घडलेल्या विविध घडामोडींवर उपायोजना करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरल्याची टीका देखील त्यांनी केली.

First Published on April 16, 2019 11:57 am

Web Title: modi saheb you are ambani adani mallyas chowkidar reaction on punes security guard