21 September 2020

News Flash

शिर्डीतल्या नांदुर्खी गावातले शेतकरी म्हणतात मोदीच येणार सत्तेवर

बहुतांश शेतकऱ्यांनी मोदींची कामगिरी समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे

शिर्डीतल्या नांदुर्खी या गावातले शेतकऱ्यांनी फिर एक बार मोदी सरकार हाच नारा दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने लोकसत्ता ऑनलाईनने शिर्डी मतदारसंघांमध्ये जाऊन तिथला आढावा घेतला. देशाला पुन्हा एकदा कठोर निर्णय घेणाऱ्या मोदींचीच गरज आहे असं मत नांदुर्खी गावातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी सर्जेराव चौधरी असं म्हणतात की मोदी सरकारमुळे शेतीबाबतच्या अनेक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आली. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे. असं झाल्यास ते आणखी हिताचे निर्णय घेतील. कधी कधी कठोर निर्णयांचे वाईट परिणाम सुरूवातीला दिसतात आणि चांगले परिणाम नंतर दिसतात. देशाला सक्षम करणाऱ्या सरकारची गरज आहे असंही चौधरी यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी कोंडाजी प्रधान यांनीही देशात मोदी सरकारच आलं पाहिजे असं परखड मत व्यक्त केलं.

लहू निठवे आणि योगेश शरमाळे या दोन तरूण शेतकऱ्यांनी शिर्डी मतदारसंघाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचा खासदार निवडून येवो की आघाडीचा आमचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. वीज आणि पाणी हे नियमित मिळालं तरीही आम्ही चांगले प्रयत्न करून शेतीतून चांगले उत्पादन मिळवू शकतो मात्र त्याबाबत काम करण्याची कुणाची मानसिकता दिसत नाही असे या दोन तरूण शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. शिर्डीतल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करतानाच देशपातळीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सत्ता यायला हवी असे या दोघांनी म्हटलं आहे. देशपातळीवरचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगल्या योजना आणल्या आहेत त्यांना आणखी एक संधी द्यायला हवी असं मत लहू निठवे आणि योगेश शरमाळे या दोन्ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

मुकुंद दाभाडे हे शेतकरी म्हणतात, नरेंद्र मोदींनी नोटाबंदीसारखा एक चांगला निर्णय घेतला. या निर्णयामुळे पारदर्शकता आली. नगरमधून सुजय विखे पाटील आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे निवडून आले तर या नगर जिल्ह्याचा कायापालट होईल असंही दाभाडे यांनी म्हटलं आहे. निळवंडे धरणातलं पाणी आणण्यासाठी सदाशिव लोखंडे विशेष प्रयत्न करत आहेत असंही दाभाडेंनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानलाही चोख उत्तर दिलं आहे आणि जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

शेतकरी सखाराम चौधरी म्हणतात मोदींना आणखी एक संधी दिली पाहिजे कारण त्यांनी शासकीय व्यवहारांमधील भ्रष्टाचाराला आळा घातला. नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि पारदर्शकता आणली. या निर्णयामुळे सुरूवातीला थोडा त्रास झाला हे निश्चित मात्र हा निर्णय घ्यायला हवा होता तो देशहिताचा होता असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 6:00 pm

Web Title: modi will definitely win says farmers in nandurkhi village shirdi
Next Stories
1 ‘अर्जुन, साराप्रमाणेच तुम्हीही मतदान करा’; सचिनचा आग्रह
2 पाच वर्षात नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ५२ टक्के वाढ, जाणून घ्या…
3 काँग्रेसला मत दिल्याने ममता बॅनर्जींच्या समर्थकाने पत्नीला पाजलं अॅसिड
Just Now!
X