20 September 2020

News Flash

मोदीच बहुमतानं जिंकावेत; मुस्लीम महिलांची माहिमच्या दर्ग्यात प्रार्थना

मुस्लिम महिलांनी मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून दुवा मागितली

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडून यावेत म्हणून मुस्लीम महिलांनी मुंबईतल्या माहिमच्या दर्ग्यात दुवा मागितली. भाजपाचे सरकार आल्यानंतर आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातले अनेक प्रश्न सुटले आहेत. गावांमधली परिस्थिती सुधारली, उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहचला. चूल पेटवून डोळ्यात धूर जाणाऱ्या महिलांचे हाल या योजनेमुळे कमी झाले. त्यांना आणखी एक संधी दिली पाहिजे असं मत या महिलांनी व्यक्त केलं आहे.

भाजपा आणि मोदींची सत्ता आल्याने आपला देश प्रगती करतो आहे असंही मत या महिलांनी व्यक्त केलं. पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत ही आमची इच्छा आहे. त्याचमुळे आम्ही या दर्ग्यात दुवा मागितली आणि मोदी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारपासून वाराणसीत आहेत. आता मोदीच विजयी व्हावेत अशी इच्छा मुस्लिम महिलांनी व्यक्त केला आणि आम्ही मोदींच्या विजयासाठी दर्ग्यात प्रार्थना केल्याचं या महिलांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीत अर्ज दाखल केला. ते पुन्हा एकदा विजयी होतील असा विश्वास मुस्लीम महिलांनी व्यक्त केलं आहे. जागतिक पातळीवरही मोदींनी आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानलाही चोख प्रत्युत्तर दिलं. देश विकासाची गती गाठतो आहे, मोदी पुन्हा एकदा जर पंतप्रधान झाले तर देशाची आणखी चांगली प्रगती होईल असंही या महिलांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:49 pm

Web Title: modi will win majority muslim women pray in the tomb of mahim
Next Stories
1 मोदींच्या नाही तर योगींच्या खुर्चीवर काँग्रेसचा डोळा – अखिलेश यादव
2 बलात्कार प्रकरणात नारायण साई दोषी, ३० एप्रिलला शिक्षेचा फैसला
3 मसाला व्यापाऱ्याने कुटुंबाच्या मदतीने घडवले श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट
Just Now!
X