11 August 2020

News Flash

भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार न झाल्याचा मोदींचा दावा खोटा- धनंजय मुंडे

 अच्छे दिनची चौकाचौकात चेष्टा होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १२५ कोटी लोकांची फसवणूक केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अकलूज येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या सरकारमध्ये पाच वर्षांत भ्रष्टाचार कोणी केला नाही, असा दावा केला  मात्र  सभेतील स्टेजच्या मागे बसलेल्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ५५० कोटींचा तूर खरेदी घोटाळा केला आहे. त्यामुळे पुढे चौकीदार आणि मागे चोर असा मोदींचा  कारभार आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी जामखेड तालुक्यातील  खर्डा  येथील सभेत केली.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत खर्डा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, शरद भोरे, संजय वराट, विजयसिंह गोलेकर, नितीन गोलेकर, प्रा. सचिन गायवळ काँग्रेसचे नेते रमेश आजबे उपस्थित होते.

ऊसतोड मजुरांचे महामंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन सरकारने  समस्त ऊसतोड मजुरांसह स्व. गोपीनाथ मुंडे यांचा अपमान केला आहे. महामंडळ बरखास्तीच्या प्रस्तावावर सही करुन आपण कुठला वारसा चालवत आहोत हे एका महिला मंत्र्याने दाखवून दिले आहे, अशी टीका पंकजा मुंढे यांचे वर करून ते पुढे म्हणाले की माझ्या सारखा फाटका कार्यकर्ता जर त्या ठिकाणी असता तर सरकार उलथवून टाकले असते.

अच्छे दिनची चौकाचौकात चेष्टा होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १२५ कोटी लोकांची फसवणूक केली आहे. गेल्या पाच वषार्ंत पेट्रोल, डिझेल व गॅसदरवाढ झाल्याने नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. सबका साथ सबका विकास म्हणत असताना देशाचा विकास झाला नाही, म्हणून भाजपवाल्यांना आता राम मंदिराचा मुद्दा आठवला असल्याची खरमरीत टीका मुंडे यांनी यावेळी भाजप सरकारवर केली. नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असे मोदींनी सांगितले मात्र पुलवामा हल्ला कसा झाला याची जबाबदारी पंतप्रधानांनी का घेतली नाही? असा सवाल उपस्थित करत  आपला पराभव दिसू लागताच  शहिदांच्या व जातीच्या नावाने मते मागण्याची दुर्दैवी वेळ मोदींवर आली असल्याची टिका त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2019 1:48 am

Web Title: modis claim that corruption has not happened during bjp government is false
Next Stories
1 कोल्हापुरातील रुईकर कॉलनी निवडणुकीचा केंद्रबिंदू!
2 ‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे!
3 काँग्रेसमधील गटबाजी निरुपम यांना भोवणार?
Just Now!
X