21 September 2020

News Flash

काँग्रेस जीना यांचा पक्ष, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचाही सहभाग : शत्रुघ्न सिन्हा

काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष आहे.

फोटो सौजन्य- ANI

काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते आणि त्यामुळेच मी या पक्षात आलो आहे, असे विधान काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते.

सिन्हा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने देशासाठी मोठे योगदान दिल्यानेच मी काँग्रेसमध्ये आलो आहे. यानंतर पुन्हा कुठेही जाणार नाही. दरम्यान, त्यांनी आपल्या डायलॉगबाजीच्या अंदाजात भाजपावर पुन्हा एकदा सडकून टीका केली. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो आणि पक्षापेक्षा देश मोठा असतो. देशापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. मोदींनी जेव्हा नोटाबंदीनंतर जीएसटी लागू केला तेव्हा तो आंबट लिंबावर कारलं खायला दिल्यासारखं होतं, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.

सिन्हा हे बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही कायस्थ समाजाचे आहेत. या मतदारसंघात कायस्थ समाजाची मोठी संख्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 10:08 am

Web Title: mohd ali jinnah had the most important role in development freedom of the country says shatrughan sinha%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8 %e0%a4%9c%e0%a5%80
Next Stories
1 श्रीलंका : सुरक्षा रक्षकांना मोठे यश, चकमकीत ‘आयएस’चे १५ दहशतवादी ठार
2 एअर इंडियाचा सर्व्हर सुरु; सहा तास खोळंबलेल्या प्रवाशांचा सुटकेचा निश्वास
3 महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कर्नाटक पोलिसांकडून अॅलर्ट
Just Now!
X