21 September 2020

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे सुपूत्र अनंत अंबानी उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वांद्रे येथे सभा होत आहे. या सभेसाठी मुकेश अंबानी यांचे सुपूत्र अनंत अंबानी उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वांद्रे येथे सभा होत आहे. या सभेसाठी मुकेश अंबानी यांचे सुपूत्र अनंत अंबानी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐकायला आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहे असे अनंत अंबानी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. अनंत अंबानी यांची मोदींच्या सभेला उपस्थिती हे एकप्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर असल्याचे मानले जात आहे.

कारण दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईतील एका सभेत मुकेश अंबांनी यांनी दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मुकेश अंबांनीनी मिलिंद देवरांचे केलेले समर्थन हा दक्षिण मुंबईपुरता विषय मर्यादीत नाही. हा देशासाठी एक संदेश आहे. भाजपाचे सरकार जाणार, मोदी पंतप्रधान होणार नाहीत हा त्या मागचा अर्थ आहे असे राज ठाकरे म्हणाले होते.

आज अनंत अंबानी यांची मोदींच्या सभेला उपस्थिती हा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना एकप्रकारे उत्तर आहे. प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अलीकडे एका व्हिडिओमध्ये दक्षिण मुंबईतील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीचे समर्थन केले होते. मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 8:16 pm

Web Title: mukesh ambani son anant ambani present to narendra modi meetin at mumbai
Next Stories
1 गरीबीच्या नावाखाली मते मागणे मान्य नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 शिर्डीकर म्हणतात देशात पुन्हा एकदा येणार मोदींचीच सत्ता
3 नरेंद्र मोदींना मातीचे लाडू पाठवणार, ममतादीदी भडकल्या
Just Now!
X