25 February 2020

News Flash

आधी चिंतेचे भाव, नंतर फुलले हास्य!

तिसऱ्या फेरीत गडकरींनी ४५ हजारांची आघाडी घेताच भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले.

कार्यकर्त्यांनी अनुभवला मतमोजणीतील चढउतार

नागपूर : निवडणूक काळात नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले या दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला होता, परंतु आज गुरुवारी प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. मात्र, गडकरींनी तिसऱ्या व चौथ्या फेरीत चांगली आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र हिरमुसले.

दोन्ही पक्षाचे कार्यकत्रे भल्या पहाटे पाचच्या सुमारास कळमना बाजारात पोहचले. सकाळी नऊच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी पहिल्या फेरीत कोण आघाडी घेणार, याबाबत उत्सुकता होती. पहिल्या फेरीतच गडकरी यांनी १५ हजारांची आघाडी घेतली. तरी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला नाही. दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मताधिक्य भरून निघेल, असा आत्मविश्वास दिसला. दुसऱ्या फेरीच्यावेळी आत असलेल्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीच्या आधारावर आकडय़ांची बेरीज केली जात होती. दुसऱ्या फेरीत गडकरींनी ३३ हजारांची आघाडी घेतल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.  दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकत्रे आत असलेल्या उमेदवार प्रतिनिधींची आतुरतेने वाट बघत भर उन्हात उभे होते. तिसऱ्या फेरीत गडकरींनी ४५ हजारांची आघाडी घेताच भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले. आता गडकरी थांबणार नाहीत, अशी चर्चा भाजपच्या गटात रंगताना दिसून आली. उर्वरित फेऱ्यांमध्ये काँग्रेस कशी आघाडी घेईल, याची चिंता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसली.चौथ्या फेरीत गडकरींनी ५७ हजारांची आघाडी घेतली नाही. याचदरम्यान मतमोजणी केंद्रावर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंचे आगमन झाले. कार्यकर्त्यांमध्ये थोडा जोश आला. काही कार्यकर्त्यांनी पटोले येताच मतमोजणी केंद्रावरील कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, सायंकाळी गडकरींनी एक लाखांच्यावर आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाची अपेक्षा सोडून दिली.

जिल्हाधिकारी मुर्दाबादचे नारे 

पूर्व नागपूरच्या सर्व फेऱ्या आटोपल्यावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतिनिधी अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी व्हीव्हीपॅटच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. त्यावेळी जिल्हाधिकारी वंजारी यांच्यावर भडकले आणि बाहेर निघा, अशा शब्दात ओरडले. त्यामुळे संतापलेल्या वंजारींनी जिल्हाधिकारी मुर्दाबादचे नारे दिले. तणाव निर्माण होत असल्याचे बघून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

First Published on May 24, 2019 2:22 am

Web Title: nagpur lok sabha election result 2019 bjp nitin gadkari congress nana patole
Next Stories
1 रामटेक मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान गोंधळ
2 भाजप मुख्यालयात राहुल गांधींच्या पराभवाची चर्चा..
3 वैचारिक लढाई निर्णायक वळणावर
Just Now!
X