News Flash

सिद्धेश्वर महाराजांच्या वक्तव्यावर मोदी, फडणवीस, अमित शाह, दानवे यांनी माफी मागावी – नवाब मलिक

'पंढरपूरच्या पांडुरंगाचा आणि तुळजापूरच्या आई भवानीचा अपमान सहन करणार नाही'

नवाब मलिक

भाजपा उमेदवार सिद्धेश्वर महाराज यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाध्यक्ष अमित शाह व रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

‘भाजपामध्ये सर्व नेत्यांना देव करण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपाचे नेते मोदींना देव बनवून त्यांची मंदिरे बनवली जात आहेत तर दुसरीकडे भाजपाचे उमेदवार सिद्धेश्वर महाराज स्वतःला देव सांगत आहेत. स्वतः ला देव करा परंतु पंढरपूरच्या पांडुरंगाचा आणि तुळजापूरच्या आई भवानीचा अपमान करु नका असे सांगतानाच देव बनायचं तर बना, लोक ठरवतील देव म्हणायचं की नाही. परंतु पंढरपूरच्या पांडुरंगाचा आणि तुळजापूर येथील आई भवानीचा अपमान सहन करणार नाही असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

काय म्हणाले सिद्धेश्वर महाराज –
भाजपाने सोलापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी शनिवारी भवानी पेठेतील अथर्व गार्डन येथे प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेतील जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे भाषण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

“येत्या १५ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत कोणीही सहलीला किंवा देवदर्शनासाठी जाऊ नये. देवदर्शनासाठी गेलात तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही. तुम्हाला समाधान मिळणार नाही. तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला तरी देव भेटणारही नाही आणि बोलणारही नाही. कारण बोलणारा देव मीच आहे”, असे जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी म्हटले आहे. मतदान हे पवित्र काम आहे. मताचे दान टाकून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. १८ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर त्यांनी विधान केले आहे. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोण आहेत जयसिद्धेश्वर महास्वामीजी ?
वीरशैव लिंगायत समाजात प्रभाव असलेले डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी शिवाचार्य हे सनातनी विचारांचे असून त्यांच्यावर भाजपचा अर्थात हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव आहे. जानेवारी महिन्यात सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली, त्या वेळी हे महास्वामीजी शिवाचार्य केवळ हजर राहिले नव्हते, तर त्यांनी सभास्थळी स्वत:च्या हाताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांची प्रतिमा असलेले हातमाग कापड उंच झळकावले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 5:15 pm

Web Title: narendra modi devendra phadanvis should apologised on siddheshwar maharaj statement
Next Stories
1 आचारसंहिता म्हणजे काय?
2 रॉबर्ट वढेरा यांना दिलासा, आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
3 फेसबुकचा काँग्रेस समर्थकांना दणका, अग्राह्य मजकूरप्रकरणी ६८७ पेजेस बंद
Just Now!
X