नथुरामचे गोडवे ही देशभक्ती नाही, तो एक खुनी होता त्याचे गोडवे गाणं हा देशद्रोह आहे. साध्वी प्रज्ञा यांनी जे वक्तव्य केलं त्यात त्यांनी नथुरामला देशभक्त म्हटलं आहे. नथुराम गोडसे हा देशद्रोही होता. साध्वी प्रज्ञा त्याचे गोडवे कसे काय गाऊ शकतात? साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी असंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली. आता साध्वी प्रज्ञा त्याला देशभक्त म्हणत आहेत. मोदी आणि शाह हे याबाबत गप्प का असाही प्रश्न दिग्विजय सिंग यांनी विचारला आहे.
Digvijaya Singh, Congress LS candidate from Bhopal on Pragya Thakur’s remarks: Modi ji, Amit Shah ji & the state BJP should give their statements & apologize to the nation. I condemn this statement, Nathuram Godse was a killer, glorifying him is not patriotism, it is sedition. pic.twitter.com/HWp3ZMzREZ
— ANI (@ANI) May 16, 2019
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य केलं. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. एवढंच नाही तर नथुरामला दहशतवादी म्हणणाऱ्यांना धडा शिकवू असाही इशारा साध्वी प्रज्ञा यांनी दिला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे आता त्याविरोधात प्रतिक्रिया येणं सुरू झालं आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर नथुरामला देशभक्त म्हटल्यावर काँग्रेस नेते गप्प थोडेच बसणार आहेत. त्यामुळे या वक्तव्याप्रकरणी मोदी आणि अमित शाह या दोघांनी देशाची माफी मागावी अशी मागणी आता दिग्विजय सिंग यांनी केली आहे.
अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसेबाबत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता अशी प्रतिक्रिया दिली होती. याच वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी नथुराम गोडसे हा दहशतवादी होता असं म्हणणाऱ्यांना धडा शिकवला जाईल नथुराम देशभक्त होता आहे आणि राहिल असं वक्तव्य केलं. याच वक्तव्यावर आता चौफेर टीका होताना दिसते आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 5:18 pm