25 September 2020

News Flash

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी नवनीत राणा कौर लोणावळ्यात

पार्थ पवार यांनाच निवडून द्या असं आवाहन नवनीत राणा कौर यांनी केलं

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लोणावळा शहरात अजित पवार आणि नवनीत राणा कौर यांनी पदयात्रा आयोजित केली. अजित पवार अनुपस्थित राहिल्याने भर उन्हात नवनीत राणा कौर यांनी प्रचार केला. यावेळी त्यांनी पार्थ पवारांचे खासगी फोटो व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली. कोणामध्ये किती दम आहे ते निवडणूक निकालानंतर दिसेल असाही टोला त्यांनी लगावला.

मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळते आहे. ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे ठरणारी असल्याचं बोललं जात आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीचे नेते मावळमध्ये ठाण मांडून आहेत. सकाळी लोणावळा शहरात पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ नवनीत कौर राणा आणि अजित पवार यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.

मात्र,अजित पवार या पदयात्रेला येऊ शकले नाहीत. नवनीत कौर राणा यांनी लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सुरुवात केली. सूर्य आग ओकत आहे सध्याचे तापमान हे ४१ अंशाच्या पुढे गेले असून अश्या उन्हात नवनीत कौर राणा यांनी पार्थ अजित पवार यांच्यासाठी पदयात्रेत सहभागी झाल्या. राणा यांच्या सहभागामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 4:09 pm

Web Title: navneet rana kaur campaign for parth pawar in lonavala
Next Stories
1 पालघरच्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही-उद्धव ठाकरे
2 बावखलेश्वर मंदिर प्रश्नी शिवसेना राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करणार
3 गौतम ‘गंभीर’ अडचणीत; निवडणूक आयोगाने दिले FIR दाखल करण्याचे आदेश
Just Now!
X