29 October 2020

News Flash

उद्धव ठाकरे मी मैदानात उतरण्याची गरज नाही माझे पहिलवानच तुम्हाला भारी पडतील -शरद पवार

मी १४ निवडणूका लढल्या आणि जिंकल्यासुद्धा त्यामुळे मैदान सोडून मी पळणारा नाही. उध्दव ठाकरे तुम्ही एकदा मैदानात उतरुन दाखवा.

मी १४ निवडणूका लढल्या आणि जिंकल्यासुद्धा त्यामुळे मैदान सोडून मी पळणारा नाही. उध्दव ठाकरे तुम्ही एकदा मैदानात उतरुन दाखवा मी उतरण्याची गरजच पडणार नाही माझे पहिलवानच तुम्हाला भारी पडतील असे जबरदस्त आणि थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना मंचर येथील जाहीर सभेत दिले. महाआघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची मंचर येथे विराट अशी सभा आज सायंकाळी पार पडली.

उध्दव ठाकरेंनी मैदानाबाबत बोलू नये. ज्यांनी कधी मैदान पाहिले नाही त्यांच्या तोंडी मैदानाची भाषा शोभत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागलीच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री आणि यांनी कधी शेतकऱ्यांसाठी काम केले नाही…कामगारांसाठी काम केले नाही…फक्त सत्ता हातात घेतली आणि त्या सत्तेचा काय भरण्यासाठी वापर केला ते मी जाहीर बोलू इच्छीत नाही असेही शरद पवार म्हणाले.

गप्पा मारणारे बरेच लोक इथे आहेत. पुण्यात विमानतळ झाले असते तर आज खुप काही झालं असते. शेतीमाल थेट परदेशी गेला असता. परंतु या भागातील खासदारांनी त्याला विरोध केला. खासदारांच्या दुटप्पी भूमिकेमुळे विमानतळ झाले नाही. हे असे खासदार आपल्याला हवेत तरी कशाला ? असा सवाल करतानाच आम्ही अमोल कोल्हे यांना यासाठीच उमेदवारी जाहीर केली. अमोल कोल्हे यांनी या भागाच्या विकासासाठी खूप स्वप्न बघितली आहेत. ती स्वप्न साकार करण्यासाठी अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

या सभेत संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविण गायकवाड, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपले विचार मांडले. यावेळी शिरुर, खेड येथील शिवसेना- भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिरुरचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड, तालुकाध्यक्ष विष्णूकाका पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते -पाटील, पैलवान मंगलदास बांदल, देवदत्त निकम, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, संजय काळे, अतुल बेंडके आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2019 9:35 pm

Web Title: ncp chief sharad pawar slam uddhav thackeray
Next Stories
1 अक्षय कुमार सारखा प्रश्न विचारण्याची हिम्मत कुठल्या पत्रकाराचीही झाली नसती – राज ठाकरे
2 अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेच्या व्हिडिओचा मोदींच्या प्रचारासाठी वापर – राज ठाकरे
3 …मग सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही – राज ठाकरे
Just Now!
X