सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या या भाजपा सरकारच्या काळात झाल्या आहेत. आत्महत्या झाल्यानंतर त्यांची कुटुंब उघड्यावर पडली आहेत आणि त्यांचे प्रवक्ते आत्महत्याग्रस्त मुलांना अनाथ आणि लावारीस म्हणतात त्यांनी जना ची नाही मनाची तरी लाज बाळगावी अशी सडकून टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा सरकार केली आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात कामगार मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात शेतमालाला भाव नसल्याने सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांची कुटुंब उघड्यावर पडली आणि त्यांचे प्रवक्ते बोलताना काय सांगतात ही लावारीसांची मूल असून ती अनाथ आहेत. यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी अशी सडकून टीका पवार यांनी केली.

घरातील एखादा करता माणूस आत्महत्या करतो त्याचा प्रपंच चालत नाही तो निघून जातो आणि त्या मुलांना तुम्ही अनाथ मुलं म्हणता त्यांना लावारीस म्हणता हे तुम्ही बोलूच कसं शकता असं अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक आहे, मतांची विभागणी होऊ नये म्हणून समविचारी पक्ष एकत्र आलो आहोत. मावळ,बारामती आणि शिरूरमध्ये सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार आहेत ते तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील असं अजित पवार म्हणाले.