18 September 2020

News Flash

शिर्डीतल्या सभेत नितीन गडकरींना भोवळ

आता गडकरींची प्रकृती स्थिर आहे असंही समजतं आहे

शिर्डीतल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. ते बोलत असतानाच त्यांना भोवळ आली आणि ते खाली बसले. नितीन गडकरी यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. सभा सुरू असतानाच नितीन गडकरी यांना भोवळ आली. तिथे तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याआधी डिसेंबर महिन्यात राहुरीमध्येही नितीन गडकरींना चक्कर आली होती. त्यावेळीही त्यांच्या रक्तातली साखर कमी झाली होती. आता लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपला आहे. मात्र शिर्डीतल्या सभेत नितीन गडकरींना चक्कर आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असेही समजते आहे.

सध्या राजकारण तापलं आहे आणि तसंच उन्हाचा पाराही चांगलाच वाढला आहे. याच उष्णतेचा त्रास नितीन गडकरी यांना झाला आणि ते अचानक खाली बसले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती समजते आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात राहुरी या ठिकाणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींना चक्कर आली होती. या घटनेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही प्रकृती जपण्याचा सल्ला ट्विटरवरून दिला होता. आता प्रचाराच्या रणधुमाळीत पुन्हा एकदा तशीच घटना शिर्डीमध्ये घडली आहे. शिर्डीतल्या प्रचारसभेत नितीन गडकरींना भोवळ आली. त्यानंतर ते बसले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशीही माहिती मिळते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 5:25 pm

Web Title: nitin gadkari unwell in shirdi sabha
Next Stories
1 दोन कारखान्यांच्या तुलनेत देशात आता १२५ मोबाइल कारखाने – पंतप्रधान मोदी
2 जळगावातल्या भडगावातील एका केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान
3 शिवबंधनात अडकलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती
Just Now!
X