केंदुझार (ओडिशा )

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून भारतीय जनता पक्ष असेपर्यंत कोणीही काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकत नाही, असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ठणकावून सांगितले.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मौनाचा चांगलाच समाचार घेतला.

नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याचा प्रयत्न करणार असून ज्याच्यामुळे काश्मीरसाठी वेगळे पंतप्रधान असू शकतात, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. काँग्रेस पक्षाने ज्या पक्षाशी आघाडी केली आहे, अशा पक्षाचे नेते दोन पंतप्रधानांची भाषा करत असूनही राहुल गांधी मात्र ‘शांत’ आहेत, अशी टीका शहा यांनी केली.  ओमर अब्दुल्ला काश्मीरसाठी वेगळे पंतप्रधान असावेत असे सुचवताहेत. देशात दोन पंतप्रधान शक्य आहे का? यावर राहुल गांधींनी  प्रतिक्रिया दिलेली नाही, असे ते म्हणाले.