News Flash

५६ पक्ष एकत्र आले तरी ५६ इंच छातीच्या मोदींचा पराभव करू शकणार नाहीत- विनोद तावडे

पवार कधीही खरं बोलत नाहीत !

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी अश्या ५६ पक्ष आणि संघटना एकत्र आल्या तरी ५६ इंच छातीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करू शकणार नाहीत, अशा शब्दात राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते हिंजवडी मध्ये भाजपाच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी केंद्री मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विनोद तावडेंनी शरद पवार कधीही खरं बोलत नाही, मात्र खोटं रेटून बोलतात अशा शब्दात पवारांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.

यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले, “मायावती, ममता दीदी, चंद्रबाबू आणि शरद पवार यांना वाटतं नरेंद्र मोदी हे हरले पाहिजेत. पण ते स्वतः मात्र निवडणूक लढायला तयार नाहीत. शरद पवार यांनी तर माढ्यातून पळ काढला. या निवडणुकीत विरोधकांचा अब तक ५६ केल्याशिवाय राहणार नाही.” विनोद तावडेंनी विरोधी पक्षांवर घणाघात केला.

मी महाआघाडी केली म्हणून नरेंद्र मोदी माझ्यावर टीका करतात असं शरद पवार म्हणाले होते. मात्र ही महाआघाडी खरचं झाली आहे का? असा सवाल यावेळी तावडेंनी उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी २५ जणांनी हातात हात घालून फोटो काढला, मात्र त्यातील एक एक मागे गेले आहेत. महाआघाडी आता राहिलेलीच नाही. शरद पवार कधीही खरं बोलत नाहीत मात्र खोटं रेटून बोलत असल्याचंही तावडे म्हणाले. शरद पवारांच्या माढ्यामधून माघार, पार्थ पवारला मावळची उमेदवारी देणार नाही, एअरस्ट्राईक करण्याचा सल्ला अशा अनेक उहारणांचा दाखला देऊन तावडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसवर तोफ डागली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 6:37 pm

Web Title: no party can defeat pm narendra modi says vinod tawde
Next Stories
1 अभिनंदन यांना भारताकडे सोपवले नसते तर ती ‘काळरात्र’ ठरली असती : मोदी
2 देशात भाजपाची सत्ता येईल आणि मोदी पंतप्रधान होतील असं वाटत नाही : ईश्वलाल जैन
3 साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आणि निषेधार्ह : विजया रहाटकर
Just Now!
X