25 February 2021

News Flash

VIDEO: मतांचा जोगवा मागताना काँग्रेसच्या नेत्याचा नागीन डान्स

हा नागीण डान्स जवळजवळ १० मिनिटे चालला

आमदाराचा नागीन डान्स

लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून महिन्याभर मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. एकीकडे देशातील ९१ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु असतानाच देशातील अनेक भागांमध्ये अजूनही निवडणूकीचा प्रचार सुरु आहे. प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते मंडळी अगदी एकमेकांवर टिका करण्यापासून ते फिल्मी डायलॉगबाजीपर्यंत अनेक गोष्टी करताना दिसत आहेत. कर्नाटकमधील अशाच एका प्रचारसभेत काँग्रसेच्या नेत्याचा नागीण डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री एमटीबी नागराज यांनी एका प्रचारसभेदरम्यान चक्क ‘नागीण’ या सिनेमातील गाण्यावर नागीण डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नागराज हे आपल्या समर्थकांबरोबर कटीगन्नाली गावामध्ये प्रचारासाठी गेले होते. काँग्रेसचे उमेदवार विरप्पा मोहली यांना मतदान करा असं गावकाऱ्यांना सांगण्यासाठी नागराज चिक्काबल्लापूरा मतदारसंघातील या गावात आले होते. त्यावेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नागराज यांनी अचानक नागीण डान्स करण्यास सुरुवात केली. आपल्या नेत्याला नाचताना पाहून समर्थकही त्यांच्याबरोबर नागीण डान्स करु लागले. नागराज यांचा हा नागीण डान्स जवळजवळ १० मिनिटे चालला. नाचायला लागल्यानंतर नागराज यांचा उत्साह वाढला. ते अंगात आल्यासारखं गोलगोल फिरून नाचू लागले त्यावेळी अनेकांनी त्यांना सावकाश नाचा असाही सल्ला दिला.

प्रचारासाठी असा आगळावेगळा फंडा वापरण्याचा हा काही पहिला प्रकार नाही. याआधीही काही दिवसापूर्वी एका सभेमध्ये भाजपाचे नेते विनीत शारदा यांनी ३० सेकंद सलग भाजपाचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या कमळचा ‘कमळ… कमळ… कमळ… कमळ…’ असा प्रचार केला होता. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 12:06 pm

Web Title: overenthusiastic minister performs naagin dance to woo voters people ask him to calm down
Next Stories
1 मतदारांना गुगलकडून मतदानाचे आवाहन, डुडलद्वारे दिला संदेश
2 ‘जिए ओ बिहार के लाला!’; कन्हैया कुमारच्या प्रचारसभेतील स्वरा भास्करचे भाषण व्हायरल
3 उमेदवार संतापला, मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची केली तोडफोड
Just Now!
X