News Flash

‘शरद पवार आणि अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही’

आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं मत

पिंपरी या ठिकाणी बोलताना सुनेत्रा पवार

आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही, असा विश्वास त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापोडी येथे त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका माई काटे,महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष वैशाली काळभोर,युवती अध्यक्ष वर्षा जगताप,आदी उपस्थित होते.

सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पार्थ शरद पवार अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू त्याला घरातून मिळालेलं आहे.आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमी पणा येईल असं तो वागणार नाही असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करतील अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या अस देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या.

महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकायला मिळाले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ ला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती,त्यामुळे पार्थ ला उमेदवारी देण्यात आल्याचंही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 6:55 pm

Web Title: parth will solve publics question says sunetra pawar
Next Stories
1 ‘नमो’च्या ‘दूरदर्शना’वर काँग्रेसचा आक्षेप
2 मी जन्मतः शिवसैनिक, चौकीदार होण्याची गरज नाही – उद्धव ठाकरे
3 संपूर्ण पाकिस्तानची मदार फक्त एका पाणबुडीवर, सुरक्षेसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून
Just Now!
X