News Flash

अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – नरेंद्र मोदी

वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणून त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे. महाराष्ट्रात सत्तेत असताना ते सहा-सहा महिने झोपून राहतात. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळयांच्या आरोपांची उदहारणे दिली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याने धरणात पाण्याची मागणी केली तेव्हा अजित पवारांनी काय उत्तर दिले हे तुम्हाला माहित आहे. मावळमध्ये पवार कुटुंबाने शेतकऱ्यांवर गोळया चालवण्याचे आदेश दिले. स्वत: शेतकरी असून शरद पवार शेतकऱ्यांच्या समस्या विसरले. शरद पवारांचे लक्ष शेतकऱ्यांवर नव्हते असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपा सरकार सर्व योजना वेळेत पूर्ण करेल असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेचं कौतुक केले. विदर्भातील दुष्काळ आघाडी सरकारमुळे आहे असे मोदी म्हणाले. आज वर्ध्यातील गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना रात्री झोप लागणार नाही. महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांचे काँग्रेस नेत्यांनी किती अनुसरण केले हे आपल्या सर्वांना माहित आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. काँग्रेसने दिलेली शिवी माझ्यासाठी दागिना आहे असे मोदी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील मुद्दे

– महात्मा गांधींनी काँग्रेसला विसर्जित करायला सांगितले होते.
– वर्ध्यामध्ये काँग्रेस विसर्जित झाली आहे.
– यावेळी सुद्धा विदर्भात भाजपा-शिवसेनेला दहापैकी दहा जागा जिंकेल.
– आज विदर्भावर अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
– सिंचन, रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला.
– पंधरावर्षात दिलं नाही ते चार वर्षाला विदर्भाला देण्याचा प्रयत्न केला.
– पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला.
– मागच्या सरकारमध्ये कर्जमाफीमध्ये वर्ध्याला ५२ कोटी मिळाले होते.
– आमच्या सरकारमध्ये कर्जमाफीत वर्ध्याला ४२८ कोटी मिळाले.
– विरोधकांनी ५६ पक्षांची मोट बांधली आहे.
– पण देश चालवण्यासाठी ५६ पक्ष नाही ५६ इंचाची छाती लागते.
– देशाकडे वाकडया नजरेने बघणाऱ्याच काय होते ते बालकोटमध्ये पाहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 11:56 am

Web Title: pm modi addressing rally in maharashtra wardha
Next Stories
1 VIDEO: याला म्हणतात कर्तव्यनिष्ठा… मुसळधार पावसातही तो हवलदार ‘ऑन ड्युटी’ होता
2 स्पेशल सेलचे मोठे यश! जैशच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक
3 बोलणारा देव मीच आहे; सोलापूरमधील भाजपा उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अजब दावा
Just Now!
X