24 November 2020

News Flash

भारताची जनता भाग्यवान कारण त्यांच्याकडे मोदी आहेत-डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्रम्प यांचे आभार मानले आहेत

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व यश मिळवलं. एकट्या भाजपाने ३०० जागांचा टप्पा पार केला तर एनडीएने ३५० पेक्षा जास्त जागा मिळवल्या. या विजयानंतर मोदींवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय. एवढंच नाही तर भारतीय भाग्यवान आहेत कारण त्यांच्याकडे मोदी आहेत या आशयाचा ट्विटही ट्रम्प यांनी केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकतीच फोनवरून चर्चा झाली. महाविजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत आणि भारतीयांचे नेते आहेत. भारतीय जनता भाग्यवान आहे कारण त्यांच्याकडे मोदी आहेत या आशयाचं ट्विट ट्रम्प यांनी केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिले आहे. धन्यवाद ट्रम्प तुमच्यासारख्या खऱ्या मित्राकडून शुभेच्छा मिळणं हे अमूल्य आहे असं मी समजतो या आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळालं. पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार आहेत. विरोधकांचं पानिपत करणारा पराभव त्यांनी केला आहे. अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 3:31 pm

Web Title: pm modi is a great man and leader for the people of india they are lucky to have him says trump
Next Stories
1 निकालाच्या दिवशी पंतप्रधान मोदी ‘या’ कामामध्ये होते व्यस्त
2 संसदेत स्त्री शक्ती! इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार
3 Surat Fire : …अन् त्या क्षणी मी मृत्यू पाहिला
Just Now!
X