News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाकिस्तानचे एजंट, आझम खान यांचा गंभीर आरोप

आझम खान यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पाकिस्तानचे एजंट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रामपूरमध्ये झालेल्या एका सभेदरम्यान त्यांनी ही टीका केली. तुम्हाला वाटत असेल की देशाचा शत्रू पाकिस्तान आहे, अमका आहे किंवा तमका आहे. पण तसं नाही, कारण इम्रान खान कालच म्हटले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी बसतील आणि तेव्हा भारत पाकिस्तानचा वाद मिटेल. याचा अर्थच असा होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत. आधी त्यांनी नवाज शरीफ यांच्यासोबत मैत्री केली आता इम्रान खान त्यांचा दोस्त आहे.

इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार करत आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आमच्यात प्रचंड सहनशक्ती आहे, चाळीस जवान शहीद झाले हा देशावरचा आघात होता की देशाने तो सहन केला. आजही भारताल्या लोकांना असं वाटतं की हा दुश्मन किंवा तो शत्रू आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हे माहित आहे की मोदी पंतप्रधान होणार कारण कालही तुम्ही त्याच्यासोबत षडयंत्रात सहभागी होतात आणि यापुढेही असणार आहात असे म्हणत आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच ते पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 8:13 pm

Web Title: pm modi pakistans agent says azam khan
Next Stories
1 नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देशाची गळचेपी करत आहेत-राज ठाकरे
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचा केसाने गळा कापला-राज ठाकरे
3 ओमराजे आणि उद्धव ठाकरेंचे नाव चिठ्ठीत लिहून शेतकऱ्याची आत्महत्या
Just Now!
X