06 December 2019

News Flash

…म्हणून मी घड्याळ उलटं घालतो: नरेंद्र मोदी

मोदींनी त्याच्या उलटं घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे गुपित सांगितले

मोदी उलटं घड्याळ घालतात

आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणं आणि मुलाखती देताना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींच्या खासगी आयुष्यातील बरीचशी माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे गुपित सांगितले.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा सवाल अक्षयने मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी मी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागे एक विशेष कारण असल्याचे सांगितले. ‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ असं स्पष्टीकरण मोदींनी दिले.

या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये अगदी त्यांचे फोटो वापरुन तयार होणारे मीम्स, विरोधी पक्षातील नेत्यांबरोबरची मैत्री, लहानपणीच्या आठवणी अशा अनेक विषयांवर मोदींनी मोकळेपणे उत्तरे दिली.

First Published on April 24, 2019 10:34 am

Web Title: pm modi revels the reason why he wears his watch upside down
Just Now!
X