News Flash

भाजपाच्या विजयानंतर मोदी- शाह यांनी घेतली आडवाणींची भेट

अनेक दशकं मेहनत करुन पक्षाची बांधणी केली आणि जनतेसमोर एक नवीन विचारधाराही मांडली, असे मोदींनी या भेटीनंतर सांगितले.

भाजपाच्या विजयानंतर मोदी- शाह यांनी घेतली आडवाणींची भेट

२०१४ चीच पुनरावृत्ती करीत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने दमदार विजय मिळवला असून या विजयानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शुक्रवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. मोदींनी आडवाणींचे आशीर्वाद घेतले असून ट्विटरवर त्यांनी या भेटीचे छायाचित्र पोस्ट केले आहेत.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तब्बल ३०० जागांपर्यंत पक्षाने धडक दिली असल्याने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षअमता या पक्षाने कायम राखली आहे. भाजपा संसदीय पक्षाची बैठक शनिवारी होत असून त्यात मोदी यांची पंतप्रधानपदी निवड केली जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी राष्ट्रपतींची भेट घेतली जाईल. या विजयाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी मोदींनी लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. भाजपाला आज जो विजय मिळाला तो लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या नेत्यांमुळेच मिळाला. त्यांनी अनेक दशकं मेहनत करुन पक्षाची बांधणी केली आणि जनतेसमोर एक नवीन विचारधाराही मांडली, असे मोदींनी या भेटीनंतर सांगितले.

लालकृष्ण आडवाणींची भेट घेतल्यानंतर मोदी आणि शाह हे मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी गेले. या भेटीबाबत मोदी म्हणाले, मुरली मनोहर जोशी यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहेत. पक्षाला भक्कम करण्यातही त्यांनी हातभार लावला होता. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक आहेत.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. हा पक्ष ५२ जागांवर आघाडीवर असल्याने यावेळी त्यांची स्थिती किंचित सुधारली असली तरी भारतीय राजकारणावर मोदींची नाममुद्राच पुन्हा एकवार कोरली गेली आहे. लोकसभेतील ५४२ जागांपैकी भाजपाप्रणित एनडीएला ३५०, काँग्रेसप्रणित यूपीएला ८६ तर अन्य पक्षांना १०६ जागा मिळाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 11:39 am

Web Title: pm narendra modi bjp chief amit shah visit lk advani mm joshi after victory
Next Stories
1 भावाची जागाही वाचवू शकल्या नाहीत प्रियंका गांधी, जिथे प्रचार केला त्या सर्व ठिकाणी पराभव
2 बिजू जनता दलाच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या संबित पात्रा यांचा पराभव
3 पश्चिम बंगालमध्ये शाह’निती’ यशस्वी; 18 जागांवर भाजपाचा विजय
Just Now!
X