News Flash

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटास राजकारणाचा अडथळा – ओबेरॉय

शनिवारी सायंकाळी धूपारतीपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील बॉलीवूडचे अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले.

(संग्रहित छायाचित्र)

पीएम नरेंद्र मोदी हा एक चांगला चित्रपट असून तो  प्रसारित करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असून यामध्ये राजकारण आडवे येत असल्याचे सांगत विरोधकांनीही हा चित्रपट बघावा असे आवाहन बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी शिर्डीत प्रसार केले.  शनिवारी सायंकाळी धूपारतीपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील बॉलीवूडचे अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. या वेळी पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंग ,मनीष आचार्य, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक मंगेश त्रिभुवन आदि उपस्थित होते. अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर  म्हणाले की, पीएम नरेंद्र मोदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात चित्रपटावर सुनावणी होणार असल्याने आम्ही साईबाबांना साकडे घातले आहे. हा चित्रपट बघण्यासाठी मी राज ठाकरे यांना आमंत्रित करीत असून त्यांनी हा चित्रपट आमच्याबरोबर बसून बघावा, त्यांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी, ममता बँनर्जी, द्रमुक पक्षाचे नेते यांनीही एक वेळ हा चित्रपट अवश्य बघावा, असे सांगत आम्हाला एवढय़ा मोठय़ा राजकीय पक्षांबरोबर लढण्याचा अनुभव नाही मात्र आम्ही नक्कीच यशस्वी होऊ , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना बघताच मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या. शिर्डी शहर भाजपच्या वतीने भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी त्यांचा शाल देऊन सत्कार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 2:03 am

Web Title: pm narendra modi blockbuster politics oberoi
Next Stories
1 ‘पगडीवाल्या’ मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले -पंकजा मुंडे
2 आम्हाला पंतप्रधान हवा चौकीदार नको – प्रकाश राज
3 गांधी कुटुंबावर कायम टीकात्मक बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा
Just Now!
X