20 September 2020

News Flash

वाराणसीत शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदींकडून उमेदवारी अर्ज दाखल

गुरुवारी झालेला भव्य रोड शो फक्त काशीमध्येच शक्य आहे, असे मोदींनी सांगितले.

वाराणसीत शक्तिप्रदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए)  घटक पक्षांच्या उपस्थितीत मोदींनी उमेदवारी अर्ज भरला आहे.  “मी वाराणसीतील जनतेचा आभारी आहे. त्यांनी पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मला भरभरुन आशीर्वाद दिले. गुरुवारी झालेला भव्य रोड शो फक्त काशीमध्येच शक्य आहे”, असे मोदींनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी वाराणसीत भव्य ‘रोड शो’द्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोदी यांनी सुमारे सात किलोमीटपर्यंतच्या ‘रोड शो’ची सुरुवात केली. गंगा आरतीनंतर त्यांनी एका सभेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले होते. शुक्रवारी सकाळी मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहे. २०१४ मधील निवडणुकीत त्यांनी वाराणसीत अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय राय यांचा पराभव केला होता. तीन लाखांहून अधिक मतांनी मोदी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मोदींविरोधात काँग्रेसचे अजय राय रिंगणात उतरले आहेत.

कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मोदींनी उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एनडीएतील सर्व घटकपक्षांचे नेते या प्रसंगी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “काही लोकं असं वातावरण निर्माण करत आहे की मोदी जिंकले आणि आता मतदान नाही केले तरी चालेल. पण कृपया असं करु नका. मतदान तुमचा अधिकार आहे आणि हा एक उत्सव आहे. जास्तीत जास्त मतदान करा”, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील या प्रसंगी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:40 pm

Web Title: pm narendra modi files nomination from varanasi nda leaders present
Next Stories
1 CRPF, BSF, NSG होणार हायटेक; ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक गाड्या
2 वाराणसीत शंभराहून अधिक जवान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करणार
3 राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, सभांना होणार उशीर
Just Now!
X