06 December 2019

News Flash

ममता बॅनर्जी मला अजूनही दोन कुर्ते भेट म्हणून पाठवतात: मोदी

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु असतानाच नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता बॅनर्जींविषयीचा एक किस्सा सांगितला. ममता बॅनर्जी मला अजूनही वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात, असे मोदींनी सांगितले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अभिनेता अक्षय कुमारला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय प्रश्नांऐवजी खासगी आयुष्याबाबत मनमोकळी उत्तरं दिली. मोदी म्हणाले, राजकारणातही माझे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षातील लोकांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून त्या देखील वर्षातून एक- दोनवेळा मिठाई पाठवू लागल्या, असे त्यांनी सांगितले.

तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती, असे त्यांनी सांगितले. मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती आणि माझ्या आईने गावात साखर वाटली असती, असे मोदींनी सांगितले.

First Published on April 24, 2019 9:29 am

Web Title: pm narendra modi interview with akshay kumar talks about tmc mamata banerjee
Just Now!
X