16 October 2019

News Flash

उत्तर प्रदेशात हिंसाचाराचा कट उधळला; दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मोठा हिंसाचार घडवून आणण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. बुलंदशहर येथे पोलिसांनी काल (सोमवार) रात्री मोठ्या प्रमाणावर दारु आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे. नेहमीच्या तपासणीदरम्यान हा शस्त्रसाठा पोलिसांना आढळून आला.

निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने बुलंदशहर जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे लक्ष असून नियमितपणे तपासणी होत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४०५ अवैध हत्यारं, ७३९ कार्ट्रिज, २ कोटी रुपयांचे मद्य, दीड कोटींची रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला शस्रासाठा हा मोठा हिंसाचार घडवण्याच्या दृष्टीने जमा करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस अधीक्षक एन. कोलांची यांनी व्यक्त केली आहे.

First Published on April 16, 2019 9:19 am

Web Title: police seized huge quantity of weapons and liquor during regular checking in bulandshahr