देशभरात सध्या निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत. पहिल्या टप्प्यातील ९१ मतदारासंघातले मतदान कालच पार पडले. नागरिकांमध्येही निवडणुकीचा चांगलाच उत्साह दिसून येत नाही. उमेदवार असो किंवा समर्थक कोणीच आपल्या प्रचारात कोणतीच कसर सोडताना दिसत नाहीय. काही ठिकाणी प्रचाराच्या अगदी भन्नाट कल्पना लडवल्या जात आहेत. मध्य प्रदेशमधील मुरैना येथेही अशीच भन्नाट कल्पना लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देताना दिसत आहेत.

मुरैना शहरामधील रामनगर येथील रहिवाशी भाजपाचे समर्थक आहेत. या परिसरातील अनेक घरांच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या डोअरबेअखाली मोदींच्या समर्थनार्थ भन्नाट पोस्टबारी केली आहे. अनेक घरांबाहेरील डोअरबेल लावण्यात आलेल्या या पोस्टर्समध्ये ‘डोअर बेल खराब आहे,कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी-मोदी ओरडा’ अशी सूचना लिहिण्यात आली आहे. प्रचाराला येणाऱ्यांनी आम्हाला दराच्या बेल वाजवून त्रास देऊ नये म्हणून आम्ही ही शक्कल लडवली आहे. रामनगर येथील कॉलिनीमधील १०० हून अधिक घरांच्याबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. आम्ही दरवाजा उघडावा असं वाटतं असेल तर जोरात बेल दाबवण्याऐवजी मोदी मोदी ओरडा असंच या रहिवाश्यांना सांगायचे आहे. या परिसरामधील बहुतेकजण हे भाजपा समर्थक असून या पोस्टर्सच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींची लोकप्रियताही दिसून येत आहे.

मध्यप्रदेशमध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून सध्या राज्यभरात जोरदार प्रचार सुरु आहे. अनेकदा उमेदवार भर दुपारी येऊन नागरिकांना मत देण्याची विनंती करतात. या गोष्टीला कंटाळलेल्या नागरिकांनी नकोसे उमेदवार टाळण्यासाठी हा आगळावेळा उपाय शोधून काढला आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिलला होणार आहे. यामध्ये ६ मतदारसंघांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ६ मे रोजी होणार असून या दिवशी सात मतदारसंघांसाठीचे मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये ८ मतदारसंघासाठी मतदान होईल. हे मतदान १२ मे रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे १९ मो रोजी होणार असून हे मतदान ८ जागांसाठी होणार आहे.