News Flash

प्रचारात माणुसकीचे भान! प्रियंका गांधी यांनी रुग्णवाहिकेला मोकळा करुन दिला मार्ग

रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचं दिसताच प्रियंका गांधी यांनी वेळ न दवडता रुग्णवाहिकेला रस्ता करुन देण्यासाठी धाव घेतली

सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. काँग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधींसोबत महासचिव प्रियंका गांधींदेखील जोरदार प्रचार करत आहेत. मात्र रायबरेलीतील एका घटनेमुळे प्रियंका गांधी चर्चेत आल्या असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोड शो सुरु असतानाही स्वत: रस्त्यावर उतरुन रुग्णवाहिकेसाठी रस्ता करुन देत प्रियंका गांधी यांनी माणुसकीचे दर्शन घडवलं.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचा रायबरेलीत रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर लगेचच प्रियंका गांधी यांनी वेळ न दवडता रुग्णवाहिकेला रस्ता करुन देण्यासाठी धाव घेतली. प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत स्वत: रस्त्यावर उतरल्या आणि रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. रुग्णवाहिका जाईपर्यंत त्या तिथेच उभ्या होत्या. रुग्णवाहिका गेल्यानंतर प्रियंका गांधी आपल्या गाडीच्या दिशेने धावत गेल्या आणि तेथून रवाना झाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 4:33 pm

Web Title: priyanka gandhi makes way for ambulance stuck in traffic jam in raebareli
Next Stories
1 मीच बिहारचा दुसरा लालू प्रसाद यादव आहे – तेज प्रताप यादव
2 अरविंद केजरीवालांना हादरा, आप आमदार भाजपात
3 ‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
Just Now!
X