28 September 2020

News Flash

लढाई संपली, कर्माची फळं भोगायला तयार राहा; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत मोदींनी शनिवारी नाव घेता राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती.

आपले वडील राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर दिले आहे. मोदींवर पलटवार करताना राहुल म्हणाले की, आता लढाई संपली आहे, माझ्या वडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हा वाचवू शकणार नाहीत. तसेच प्रियंका गांधी वढेरा यांनीही मोदींवर निशाणा साधताना मोदींनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत मोदींनी शनिवारी नाव घेता राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पतंप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. राहुलने म्हटले, मोदीजी लढाई तर आता संपलेली आहे. आपले कर्म आपली वाट पाहत आहे. स्वतःची मनातल्या गोष्टी माझ्या वडिलांवर थोपवणेही आता आपल्याला थांबवू शकणार नाही.

तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी देखील आपल्या वडिलांवर पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. प्रियंका यांनी ट्विट करुन मोदींवर हल्लाबोल केला आहे. एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींनी शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत बोफोर्स घोटाळ्यावर भाष्य करताना दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करताना नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा साधला होता. मोदी म्हणाले होते, आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या वडिलांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी बनवली होती. मात्र, पाहता पाहता भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात त्यांचा जीवनप्रवास संपला. नामदार हाच अहंकार आपल्यालाही संपवून टाकेल. हा देश चुका मान्य करतो मात्र, फसवणूक कधीही मान्य करणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 3:10 pm

Web Title: projecting your inner beliefs about yourself onto my father wont protect you says rahul gandhi
Next Stories
1 साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा अडचणीत, निवडणूक आयोगानं पाठवली नोटीस
2 ‘जय श्री राम’च्या घोषणांनी ममतांचं स्वागत, म्हणाल्या…
3 #MeeTo : अकबर यांची उलटतपासणी, कोर्टात म्हणाले मला काही आठवत नाही
Just Now!
X