15 October 2019

News Flash

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा राहुल गांधींनी स्वीकारला – अशोक चव्हाण

राधाकृष्ण विखे पाटीला यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.

अहमदनगरच्या जागेचा तिढा न सुटल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे. मुलाने भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झाली होती.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. जागा वाटपात अहमदनगरचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून विखे पाटील कुटुंब काँग्रेसमधून बाहेर पडणार अशी चर्चा सुरु झाली होती.

First Published on April 25, 2019 6:52 pm

Web Title: radhakrishna vikhe patil resignation accepted by rahul gandhi ashok chavan