News Flash

वायनाडमध्ये राहुल गांधींना पराभूत करू; डाव्यांची प्रतिज्ञा

वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा राहुल गांधींचा निर्णय डाव्यांना पटलेला नाही. हे डाव्यांना आव्हान असून त्यांची लढाई भाजपाविरोधात नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठी बरोबरच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा राहुल गांधींचा निर्णय डाव्यांना पटलेला नाही. वायनाडमध्ये राहुल गांधींना पराभूत करण्याची प्रतिज्ञा डाव्यांनी केली आहे. हे डाव्यांना आव्हान असून त्यांची लढाई भाजपाविरोधात नाही असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे. वायनाडमध्ये सीपीआय(एम) राहुल गांधींना पराभूत करेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

राहुल गांधी वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वरिष्ठ काँग्रेस नेते ए.के.अॅनटोनी यांनी जाहीर केल्यानंतर काही वेळातच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हे वक्तव्य केले. राहुल गांधी केरळमधल्या २० लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ही काही वेगळी लढाई म्हणून त्याकडे पाहू नका. खरंतर भाजपा निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. पण ही डाव्यांविरोधात लढाई आहे असे विजयन यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

सीपीआय(एम)चे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी सुद्धा अशाच भावना व्यक्त केल्या. डाव्यांविरोधात राहुल गांधींसारख्या उमेदवारांची निवड करणे म्हणजे काँग्रेस केरळमध्ये डाव्यांना लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट होते. वायनाडमध्ये राहुल गांधींचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काम करु असे प्रकाश करात यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अमेठीतील भाजपाचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी अमेठीतून जिंकण्याबाबत साशंक असल्यानेच दोन ठिकाणांहून लढण्याच्या विचारात असल्याचे म्हटले होते. पत्रकरांनी रविवारी हाच प्रश्न काँग्रेस नेत्यांना विचारल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मोदींबाबतही तुम्ही हेच म्हणणार का? गुजरातमधून जिंकून येण्यास ते साशंक असल्यानेच वाराणसीतून लढत आहेत का? इराणींचे हे विधान बालिश आहे मात्र, अमेठीत त्या पराभवाची हॅट्रिक जरुर करतील असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 2:31 pm

Web Title: rahul fighting against left not bjp kerala cm
Next Stories
1 मी ब्रिटनचा नागरिक असून तिथचं राहतोय, मग फरार कसा?; मल्याच्या उलट्या बोंबा
2 हवाई दलाचे लढाऊ विमान मिग-२७ कोसळले, पायलट सुखरुप
3 ठरलं! राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार
Just Now!
X