स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणणारे राहुल गांधी हे नालायक कार्ट असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी व काँग्रेसवर जोरदार टीका केली. उद्धव म्हणाले, “सावरकरांना एक जन्मात दोन वेळा जन्मठेप भोगण्याची शिक्षा झाली. अंदमानात जा आणि पहा. किती कठीण आणि बिकट परिस्थितीत हालअपेष्टा भोगत त्यांनी दिवस काढले. अशा सावरकरांना वीर नाही बोलायचे तर त्या नेभळट राहुल गांधीना वीर बोलायचे का ?,” असे सांगताना उद्धव आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला असे म्हणाले. ज्यांनी स्वातंत्र्यसाठी लढा दिला त्यांना पाहून मान आदरानं वर येते आणि आता मान शरमेने खाली जाते असे ते म्हणाले.

उद्धव यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

– मी महाराष्ट्रभर फिरतोय. नेते मंडळींनी भाषणात आपण काय करतोय हे मतदारांना सांगितले पाहिजे.
– एका कुटुंबात वेगवेगळे झेंडे लोक घेत आहेत. तसे इथे होऊन चालायचे नाही.
– काही लोकांच्या सभेला गर्दी असते. आमच्या सभेला जी गर्दी असते ती मनाने आलेली लोक असतात.
– या मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते , राऊत आपण गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत, खासदार हवे आहेत.
– आम्ही युती केली ती युती शेतकऱ्यांसाठी, देशहितासाठी केली.
– शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यासाठी युती केली.
– मुंबईतल्या नातेवाईकांना विचारा, 500 चौरस मीटर घराचा कराचा प्रश्न निकालात काढला.
– धनुष्यबाणाला आणि कमळाला मत म्हणजे तुमचे स्वतःचे स्वतःला मत. आपल्या कुटुंबासाठी असलेल मत आहे.
– खासदारांचे शिक्षण काढता. शिक्षण काय संतानी घेतले होते का ? बहिणाबाई न शिकता त्यांनी मोठी उंची गाठली.
– राऊत तुम्ही कधीही हातातला झेंडा बदलला नाही.
– संपूर्ण सागरी किनार पट्टीचे खासदार आपल्याला भगवे पाहिजे आहेत.
– जाहीरनामा- महत्वाच्या विषयाकडे आपण दुर्लक्ष करतो ते करू नका.
– मला अभिमान आहे. राम मंदिर हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात आहे.
– सुशीलकुमार भस्म जपून ठेवा. निवडणुकीनंतर ते घेऊन हिमालयात जावे लागणार आहे.
– देव, देश आणि धर्म साठी केली युती.
– मला समोरून पण वचन हवे आहे. विनायक राउत यांचा विजय मला हवा आहे.