News Flash

Rahul Gandhi Push-ups : आधी बॉक्सर अ‍ॅब्ज, आता पुशअप्स चॅलेंज; राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल!

राहुल गांधींचा तमिळनाडूमधल्या एका शाळेतला पुशअप्स मारतानाचा फोटो व्हिडीओ भलताच व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये त्यांनी एका १०वीच्या विद्यार्थिनीसोबत पुशअप चॅलेंज खेळल्याचं दिसत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवासांपासून चांगलेच चर्चेत आहेत. कधी ते केंद्रात स्वतंत्र मत्स्य उत्पादन मंत्रालयाची मागणी करतात, तर कधी पुद्दुचेरीमध्ये मच्छिमारांसोबत बोलता बोलता अचानक पाण्यात उडी घेतात. याच ‘प्रसिद्ध उडी’नंतर राहुल गांधींचा एक भिजलेल्या टीशर्टमधला फोटो भारताचा मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने काही दिवसांपूर्वी ट्वीट केला होता. यामध्ये ‘राहुल गांधींकडे एखाद्या बॉक्सरसारख्या अ‍ॅब्ज आहेत’, असं त्याने म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा राहुल गांधी चर्चेत आले आहेत ते त्यांच्या पुश-अप चॅलेंजमुळे! सध्या राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर असून तिथेच एका शाळेच्या कार्यक्रमात त्यांनी हे पुशअप चॅलेंज घेतलं आहे. याचा व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून तो तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं झालं काय?

पुढील महिन्यात तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारसभा आणि संबंधित कार्यक्रमांसाठी राहुल गांधी सध्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये राहुल गांधी थेट सामान्य मतदारांशी कनेक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसत आहेत. सोमवारी तमिळनाडूच्या मुलगमुड्डू या ठिकाणी असलेल्या सेंट जोसेफ मॅट्रिक स्कूलमध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. फिटनेसविषयी चर्चा सुरू असताना मेरोलिना शेनिघा (Merolina Shenigha) नावाच्या विद्यार्थिनीने त्यांना पुशअप चॅलेंज दिलं. “तुम्ही पुशअप्स मारू शकता का? आपण १५ पुशअप्स मारुयात!”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi)

मेरोलिनाचं आगळं-वेगळं चॅलेंज  राहुल गांधींनीही खिलाडू वृत्तीने स्वीकारलं. त्यांनी हातातला माईक बाजूला उभ्या असलेल्या शिक्षकांकडे सोपवून पुशअप्स मारायला सुरुवात केली. त्या मुलीने देखील हळूहळू पुशअप्स सुरू केले.

…आणि राहुल गांधी ‘पराभूत’ झाले!

दोघांनीही पुशअप्स मारायला सुरुवात केली. राहुल गांधी वेगाने पुशअप्स मारत होते, तर मेरोलिनाने धिम्या गतीने का होईना पण एकापाठोपाठ एक पुशअप्स मारत होती. शेवटी मेरोलिनाचा उत्साह पाहून राहुल गांधी मध्येच थांबले. तरी देखील मेरोलिना पुशअप्स मारतच होती. राहुल गांधींनी “तू जिंकलीस”, असं म्हटलं, तेव्हा मेरोलिना थांबली. एव्हाना इतर विद्यार्थ्यांनी चीअरअप करायला सुरुवात केली. तेवढ्यात राहुल गांधींनी मेरोलिनाला थांबवून लगेच दुसरं चॅलेंज दिलं एका हातानेच पुशअप मारण्याचं. राहुल गांधींनी लगेच खाली वाकत एका हाताने एक पुशअप मारलाही. पण मेरोलिनाने सुरु करण्याआधीच ते उभे राहिले. राहुल गांधींनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर त्यावर त्यांच्या फॉलोअर्सच्या कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तासाभरातच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

 

.

गेल्याच आठवड्यात भिजलेल्या टीशर्टमधला विजेंद सिंगने ट्वीट केलेला राहुल गांधींचा फोटो देखील भलताच व्हायरल झाला होता. त्याआधी राहुल गांधींचा पुद्दुचेरीमधल्या मच्छिमारांसोबत पाण्यात पोहतानाचा फोटो देखील व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 4:49 pm

Web Title: rahul gandhi push ups challenge with 10th class girl in tamilnadu video viral pmw 88
Next Stories
1 भारतीय विद्यार्थ्यांनी शोधले १८ नवीन लघुग्रह
2 वर्फ फ्रॉम होम… वन बीएचके फ्लॅटमधून ‘हा’ भारतीय वंशांचा शास्त्रज्ञ मंगळावरील नासाचं यान करतोय कंट्रोल
3 Corona Vaccine : बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता खासगी रुग्णालयातही करोना लस मोफतच!
Just Now!
X