News Flash

केजरीवालांची राहुल गांधींबरोबर भेट निष्फळ, आघाडीला नकार

लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्यास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नकार दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी ही माहिती दिली. राहुल गांधींची मी नुकतीच भेट घेतली. त्यांनी आपसोबत हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे असे अरविंद केजरीवाल यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अरविंद केजरीवालांनी आघाडीसाठी माझ्यासाठी संपर्क साधला नाही या दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष शीला दिक्षित यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की आम्ही राहुल गांधींची भेट घेतली. शीला दिक्षित या महत्वाच्या नेत्या नाहीत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिल्लीमध्ये आप-काँग्रेस आघाडीसाठी अरविंद केजरीवाल प्रयत्न करत होते.

आपसोबत आघाडी करण्यावर दिल्ली काँग्रेसमध्ये मतभेद होते. शीला दिक्षित आणि तीन कार्यकारी अध्यक्षांचा आपसोबत आघाडीला विरोध होता. आघाडी केल्यानंतर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपचा सामना कसा करणार ? हा मुख्य प्रश्न होता. या आघाडीतून काँग्रेसला तसाही मोठा राजकीय फायदा मिळणार नव्हता असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 10:42 am

Web Title: rahul gandhi said no to aap congress alliance in delhi
Next Stories
1 स्थानिक महिलेशी मैत्री अंगलट, मेजर लितुल गोगोईंना झाली ‘ही’ शिक्षा
2 आज प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार, निवडणुकांआधी मोदींचा मास्टर्सस्ट्रोक
3 ‘इस्रो’च्या शिरपेचात मानाचा तुरा, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Just Now!
X