News Flash

ठरलं! राहुल गांधी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातील पारंपारिक अमेठी मतदारसंघातून त्यांचे नाव यापूर्वीच जाहीर झाले आहे. तसेच आता ते केरळच्या वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून रविवारी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करण्यात आले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अॅन्टोनी यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, दोन जागांवरुन लोकसभा निवडणूक लढवण्याला राहुल गांधींनी सहमती दर्शवली आहे. अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरु असताना अमेठीतील भाजपाचे उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी अमेठीतून जिंकण्याबाबत साशंक असल्यानेच दोन ठिकाणांहून लढण्याच्या विचारात असल्याचे म्हटले होते. पत्रकरांनी रविवारी हाच प्रश्न काँग्रेस नेत्यांना विचारल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले, मोदींबाबतही तुम्ही हेच म्हणणार का? गुजरातमधून जिंकून येण्यास ते साशंक असल्यानेच वाराणसीतून लढत आहेत का? इरानींचे हे विधान बालिश आहे मात्र, अमेठीत त्या पराभवाची हॅट्रिक जरुर करतील असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 11:25 am

Web Title: rahul gandhi will contest lok sabha elections from two constituencies
Next Stories
1 पंजाब: औषध परवाना रद्द, महिला आरोग्य अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या
2 आर्थिक वर्षाचा आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून होणार हे महत्वाचे बदल
3 विरोधी पक्षनेते दोघांसाठी प्रचारात
Just Now!
X