लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्दाफाश करत आहे. या निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंच्या सभांचा किती फायदा झाला हे समजेल असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेची पाठराखण केली.

राज ठाकरे यांच्या सभेचा किती फायदा होईल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. पुण्यातील काँग्रेस भवनात पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. मागील पाच वर्षात भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशभरात भाजप विरोधात प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्यावर बोलतील असे वाटत होते. मात्र त्यांच्या पक्षाच्या विचार सरनीनुसार आणि विकास केला नसल्याने वैयक्तिक टीका केली जात आहे. अशा शब्दात पंतप्रधानावावर त्यांनी निशाणा साधला.