News Flash

राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाची ‘पोलखोल’

महाड येथील सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावातील स्थिती दाखवून दिली.

(संग्रहित छायाचित्र)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाषणाचा एक नवा ट्रेंड आणला आहे. भाषण सुरु असताना ते जुने व्हिडिओ दाखवून सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडत आहेत. आज महाड येथील सभेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावातील स्थिती दाखवून दिली.

नरेंद्र मोदी यांनी खासदारांसाठी गाव दत्तक घेण्याची योजना आणली होती. आदर्श गाव कसे असावे याचे मॉडेल म्हणून दत्तक गावाचा विकास करायची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात किती भीषण परिस्थिती आहे ते राज यांनी आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले.

नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात खूप वाईट परिस्थिती आहे. तिथे काहीही काम झालेलं नाही. कॉलेज नाही, नाल्याची व्यवस्था झालेली नाही. लोकांना आजही चिखलातून मार्ग काढत चालावे लागत असल्याची तक्रार त्या दत्तक घेतलेल्या गावातील लोक करत असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. नरेंद्र मोदींना स्वत: दत्तक घेतलेल्या गावाकडे बघायला वेळ नाही तर ते तुमच्याकडे काय बघणार ? असा सवाल त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 9:06 pm

Web Title: raj thackrey show pm narendra modi adopted village situation
Next Stories
1 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2 राज ठाकरेंनी दाखवलं देशातल्या पहिल्या कॅशलेस गावातील वास्तव
3 शिवसेना-भाजपा दोघेही लाचार म्हणून युती केली – राज ठाकरे
Just Now!
X