बाराव्या फेरीपर्यंतची स्थिती नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी १२ जणांना ‘नोटा’ (नकाराधिकार) संवर्गातील मतांहून कमी मत मिळाल्याची माहिती आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे किशोर गजभिये, शिवसेनेचे कृपाल तुमाने, बहुजन समाज पार्टीचे सुभाष धरमदास गजभिये, वंचित बहुजन आघाडीच्या किरण प्रेमकुमार लोडगे (पाटणकर) सह एकूण १६ उमेदवार मैदानात होते. त्यात शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये या दोन उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होती. इतर उमेदवारातील सुभाष गजभिये यांनी बाराव्या फेरीपर्यंत २५,७८४ मते तर किरण लोडगे यांनी २१,१५३ मते मिळवली. इतर बारा उमेदवारांना नोटा संवर्गातील ७,०१३ मताहून जास्त मते मिळवता आली नाही. ही आकडेवारी बघून मतमोजणीदरम्यान स्वत उमेदवारही आश्चर्य व्यक्त करत होते. कमी मत मिळालेले उमेदवार (बाराव्या फेरीपर्यंत) उमेदवार पक्ष मिळालेली मते अर्चना उके राष्ट्रीय जनसंभवना पार्टी ४,९३० डॉ. एल. कान्हेकर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ८५४ चंद्रभान रामटेके राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी ९१४ बंडू मेश्राम कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रेड स्टार ८३३ धीमन पाटील आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया १,७०७ शैलेश जनबंधू सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया ६३३ अनिल ढोणे अपक्ष ९६० गौतम वासनिक अपक्ष ८७६ कान्तेश्वर तुमाने अपक्ष १,६४६ डॉ. नत्थूराव लोखंडे अपक्ष १,३२४ संदेश भालेकर अपक्ष २,२१८ सोनाली बागडे अपक्ष ४,७६३