24 November 2020

News Flash

संसदेत स्त्री शक्ती! इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार

एकूण ७२४ महिला उमेदवार या निवडणुकीत उभ्या होत्या, त्यांच्यापैकी ७८ जणी निवडून आल्या आहेत

लोकसभा निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल आपण सगळ्यांनी अनुभवला. मोदी पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहेत हे भाजपाला मिळालेल्या संपूर्ण बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहेत. मात्र हा निकाल महिलांसाठी विक्रमी ठरला आहे. कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत. फक्त भाजपाच नाही सगळ्याच पक्षाच्या मिळून एकूण ७८ महिला खासदार यावेळी जिंकून आल्या आहेत. त्यामुळे संसदेत स्त्री शक्ती दिसून येणार आहे. या महिला खासदारांमध्ये भाजपा, तृणमूल, बीजू जनता दल या पक्षांमधल्या महिला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. १९५२ मध्ये महिला खासदार निवडून येण्याचं प्रमाण सर्वात कमी होतं. यावेळी म्हणजेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह विविध पक्षाच्या ७८ महिला खासदार निवडून आल्या आहेत.

देशभरातून एकूण ७२४ महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यापैकी भाजपासह विविध पक्षाच्या ७८ महिला जिंकल्या. सोनिया गांधी, हेमा मालिनी, किरण खेर या महिला खासदारांनी त्यांची जागा राखत पुन्हा एकदा विजय मिळवला. मात्र लक्षवेधी ठरल्या प्रज्ञासिंह ठाकूर आणि स्मृती इराणी. कारण शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यं करून आणि नथुराम गोडसे देशभक्त होता असे म्हणूनही त्या निवडून आल्या. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह यांना हरवलं. तर स्मृती इराणी यांनी अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना हरवलं. त्यांच्याप्रमाणेच लॉकेट चॅटर्जी या बंगाली अभिनेत्रीही तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या.

एक नजर टाकुया कुठून कोण कोण निवडून आलं?

ओडिशा
प्रमिला बिसोयी
मंजुलता मंडल
राजश्री मलिक
शर्मिष्ठा सेठी
चांदरानी मुरमू
अपराजिता
संगीता सिंहदेव

पश्चिम बंगाल
काकोली घोषदस्तिदार
अपरूपा पोद्दार
नुसरत जहाँ रूही
सताब्दी रॉय
प्रतिमा मंडल
मिनी चक्रवर्ती
माला रॉय
महुआ मोइनत्रा
सजदा अहमद

उत्तर प्रदेशात जिंकणाऱ्या १० महिलांपैकी रायबरेलीतून काँग्रेसच्या एकट्या सोनिया गांधी यांच्या विजय झाला. इतर सगळ्या महिला उमेदवार भाजपाच्या आहेत.
स्मृती इराणी
रीटा बहुगुणा
राखी वर्मा
संघमित्रा मौर्य
संगीता आझाद
हेमा मालिनी
केशरी देवी पटेल
मेनका गांधी
साध्वी निरंजन

आंध्र प्रदेश
गोड्डेती माधवी
चिंता अनुराधा
बी. वी. सत्यवथी
वन्गा गीथा विश्वनाथ

कर्नाटक
शोभा करंडलाजे
अंबरीश सुमनलता
झारखंड
अन्नपूर्णा देवी
गीता कोरा

पंजाब
हरसिमरत कौर
प्रिनीत कौर

तामिळनाडू
जोथमनि एस
सुमथी
कनिमोळी

राजस्थान
रंजीता कोली
जसकौर मीन
दिया कुमारी

छत्तीसगढ
ज्योत्स्ना महंत
गोमती साई
रेणुका सिंह

बिहार
रामा देवी
कविता सिंह
वीणा देवी

मध्यप्रदेश
संध्या राय
साध्वी प्रज्ञा
हिमाद्री सिंह
रिती पाठक

गुजरात
भारती शियाल
पूनमबेन मादम
शारदबेन पटेल
दर्शना जरदोश
रंजनाबेन भट्ट

महाराष्ट्र

प्रितम मुंडे, नवनीत राणा, भावना गवळी, सुप्रिया सुळे, भारती पवार, पूनम महाजन, डॉक्टर हिना गावित, रक्षा खडसे तर या सगळ्या यादीवर नजर टाकल्यावर हे लक्षात येते की लोकसभा निवडणूक निकालानंतर संसदेत महिलाराज दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 2:23 pm

Web Title: record 78 women lawmakers elected to new lok sabha
Next Stories
1 Surat Fire : …अन् त्या क्षणी मी मृत्यू पाहिला
2 राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष, कार्यकारिणीने राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळला
3 दहशतवादी झाकीर मुसाच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी
Just Now!
X