भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर माफीनामा जाहीर मागत तीन दिवसांचे मौन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विट करत साध्वी यांनी ही माहिती दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असा दावा केला होता. साध्नी यांच्या या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाल्याचे पाहून भाजपाने हात वर केले होते. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं होतं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली होती. आज सोमवारी प्रज्ञा ठाकूर यांनी ट्विट करत पुन्हा एकदा माफी मागत मौध धारन करणार असल्याचे सांगितले.

‘मतदान संपल्यानंतर आता चिंतन सुरू आहे. निवडणुकीदरम्यान जर माझ्या शब्दांनी देशभक्तांना दु:ख झालं असेल तर मी माफी मागते आणि त्याचं प्रायश्चित म्हणून २१ प्रहर (तीन दिवस) मौन पाळणार आहे’ असं ट्वीट साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलं आहे.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची वादग्रस्त वक्तव्य –
– नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल

– हेमंत करकरे यांनी मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. खोट्या आरोपांखाली मला तुरुंगात धाडण्यात आले तेव्हा माझे सुतक सुरू झाले होते. ज्या दिवशी करकरेंना दहशतवाद्यांनी ठार केले तेव्हा माझे सुतक संपले.

– बाबरी मशीद विध्वंसाबाबत बोलताना साध्वींनी आनंद व्यक्त केला होता. तसेच या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते.