News Flash

साताऱ्याची पोटनिवडणूक लांबणीवर, देशातील ६४ जागांवर होणार पोटनिवडणूक

देशातील लोकसभेच्या ६४ जागेवरील पोटनिवडणूकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये शनिवारी महाराष्ट्र विधानसभा, हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागेवरील पोटनिवडणूकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रामधील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात दाखल होतं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे.

(आणखी वाचा – आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? )

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान साताऱ्याची पोटनिवडणूक मात्र आता लांबणीवर गेली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत जाहीर करण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात दोन्हीही निवडणूका एकत्र होतील असे म्हटले होते पण तसे झाले नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीकडून तयारी सुरू झाली आहे. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून राष्ट्रवादीकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

या राज्यात होणार पोटनिवडणुका –
अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिसा ,पॉण्डचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, आणि उत्तर प्रदेश

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:59 pm

Web Title: satara by election postponed nck 90
Next Stories
1 पंतप्रधान मोदींच्या आधी डोनाल्ड ट्रम्प घेणार इम्रान खान यांची भेट
2 चांद्रयान-२ : चंद्रावर रात्र, ‘विक्रम’शी संपर्काच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या!
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X