18 November 2019

News Flash

मोदींना शुभेच्छा देऊनही शबाना आझमी ट्रोल, युजर्सनी पोस्ट केले बरनॉलचे फोटो

शबाना आझमी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनदंन करणारा संदेश लिहिला आहे

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. शबाना आझमी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनदंन करणारा संदेश लिहिला आहे. ‘भारतीय जनतेने जबरदस्त जनादेश दिला आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपाप्रणीत एनडीएचं अभिनंदन’, असं शबाना आझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मात्र शबाना आझमी यांच्या या ट्विटरवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. काहीजणांनी बरनॉलचा फोटो टाकत शबाना आझमी यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. तर काहीजणांनी शबाना आझमी यांना भारत सोडून पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपुर्वी शबाना आझमी यांनी नरेंद्र मोदींचा विजय झाल्यास आपण भारत सोडून जाऊ असं वक्तव्य केल्याचं वृत्त आलं होतं. मात्र नंतर शबाना आझमी यांनी आपण असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं सांगत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

First Published on May 24, 2019 6:34 pm

Web Title: shabana azmi troll twitter narendra modi troll lok sabha election