24 January 2020

News Flash

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटय़ाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे शिक्कामोर्तब

भाईंदर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मीरा-भाईंदर विधानसभेची जागा काँग्रेससाठी सोडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मीरा रोड येथे झालेल्या प्रचार सभेत हे जाहीर केले. त्यामुळे विधानसभेची तयारी करण्यासाठी काँग्रेस आता नििश्चत झाली आहे.

ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी लढत देत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी सोमवारी मीरा रोड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातून भाजप-शिवसेनेची सत्ता उलथवून टाकायची असेल तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलादेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हातात हात घालून काम करावे आणि त्याची सुरुवात मीरा -भाईंदरपासून करावी, असे आवाहन करताना मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने चांगला उमेदवार द्यावा त्याला राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनिशी सहकार्य करेल, असे पवार यांनी यावेळी घोषित केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे घोषित केले होते. या निर्णयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात थोडी धाकधुक होतीच. जाहीर सभेत भाषण करताना काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील ही सल उघडपणे बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसमध्ये निकाह झालाच आहे आता तलाक होणार नाही अशी अपेक्षा हुसेन यांनी यावेळी बोलून दाखवली. याला उत्तर देताना मीरा-भाईंदर विधानसभा काँग्रेसलाच मिळणार असल्याचे घोषित करून शरद पवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षापूर्तीच केली असल्याची चर्चा यावेळी रंगली. पवार यांच्या या घोषणेचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

कारण काय?

यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लढत दिली होती. परंतु २०१४ च्या केंद्रातील राजकीय उलथापालथीनंतर शहरातील राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसला देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. त्यावर आता खुद्द शरद पवार यांनीच शिक्कामोर्तब केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला.

First Published on April 24, 2019 3:07 am

Web Title: sharad pawar given mira bhayander assembly seat to congress
Next Stories
1 दिवसा तपासणी, रात्री शुकशुकाट
2 संघर्ष समितीला ‘शिंदेशाही’चे वावडे
3 मुंबईच्या आखाडय़ात ४ निरक्षर, ४५ पदवीधर!
Just Now!
X