16 October 2019

News Flash

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला शरद पवारांनी दिले नोकरीचे आश्वासन

कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.

कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.

शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करणारे दिलीप ढवळे या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तडवळा येथे सोमवारी भेट घेतली. पवार यांनी दिलीप ढवळे यांच्या मुलाला आपल्या संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. मुलाचे शिक्षण झाल्यानंतर माझ्याकडे घेऊन या, असे पवारांनी ढवळे कुटुंबीयांना सांगितले.

कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ढवळे यांनी शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे नाव लिहिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी शरद पवार यांनी ढवळे कुटुंबीयांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उस्मानाबाद येथील प्रचारसभेचा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलत पवार यांनी ढवळे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी डॉ. पद्मसिंह पाटिल, विक्रम काळे, राणा दादा पाटील, जीवनराव गोरे आणि अप्पासाहेब पाटिल उपस्थित होते

राज्य सरकारने ढवळे कुटुंबीयांना तत्काळ मदत जाहीर करावी तसेच त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल होत नसल्याने शरद पवार यांनी नाराजीही व्यक्त केली. गुन्हा नोंद न झाल्यास तो कसा नोंद करवून घ्यावयाचा हे देखील आपल्याला चांगले कळते, असा इशाराच पवारांनी दिला.

भेटीदरम्यान, पवार यानी ढवळे यांच्या मुलाला आपल्या संस्थेत नोकरी देण्याबाबत आश्वासन दिले. मुलाचे शिक्षण झाल्यानंतर माझ्याकडे घेऊन या. असे त्यांनी ढवळे कुटुंबीयांना सांगितले. निखिल दिलीप ढवळे सध्या उस्मानाबादमध्ये बीसीएसच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. दिलीप ढवळे यांना दोन मुले आहे. त्यामधील मोठा मुलगा शेती करतो. तर लहान मुलाचे शिक्षण सुरू आहे.

First Published on April 16, 2019 11:40 am

Web Title: sharad pawar offers job to farmers son who commits suicide at osmanabad