News Flash

शरद पवारांनी कलम ३७० संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी – विनोद तावडे

सध्या चॅनलवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमधून भाजपा आपला निवडणूक प्रचार करत असल्याचा आरोप चुकीचा असून भाजपामार्फत मालिका निर्मात्यांवर अथवा लेखकांवर कोणताही दबाव नाही.

विनोद तावडे

घटनेचे कलम ३७० व कलम ३५ ए बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण कलम ३७० जर तसेच ठेवले तर कश्मीर प्रश्न तसाच राहतो, पण जर कलम ३७० काढले तर काश्मीर प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होते. दहशतवादी पाकिस्तानलाही हे कलम ठेवले पाहीजे असे वाटत आहे, त्यामुळे यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.

विरोधकांनी एकत्र येऊन जे काही तोडके मोडके महागठबंधन तयार केले आहे, त्याचीही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे सांगताना तावडे म्हणाले की, महागठबंधन हे तोडक मोडके असल्याचे माझे नव्हे तर सिताराम येचुरी यांचे म्हणणे आहे. विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल.

निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपाशी लढावे लागेल, अशा प्रकारचे वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत. याचा अर्थ भाजप सत्तेत येईल आणि आपण विरोधात बसू असे येचुरी बोलत आहेत, कदाचित पवारांनाही हे आधीच कळले असावे म्हणून ते निवडणूकीतून माघार घेतली.

निवडणुकीमध्ये पैसे हे काँग्रेसचे मुख्य हत्यार आहे, परंतू सध्या त्यांचे पैसे अडकले असल्यामुळे त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ असावी, असा आरोप यावेळी तावडे यांनी केला. ते म्हणाले, निवडणुकांच्या काळातील काँग्रेसच्या हालचालींची माहिती प्राप्तिकर विभागाला कळल्यामुळे त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली असेल. निवडणूक आयोगानेही यामध्ये सरकारचा हात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या चॅनलवर दाखविण्यात येणाऱ्या मालिकांमधून भाजपा आपला निवडणूक प्रचार करत असल्याचा आरोप चुकीचा असून भाजपामार्फत मालिका निर्मात्यांवर अथवा लेखकांवर कोणताही दबाव नाही. तरीही विरोधकांचा या संदर्भात काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोग हा विषय तपासून पाहील, असे यावेळी तावडे म्हणाले. त्याचबरोबर खार येथे काल निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपाशी काहीही संबध नाही, हे आमचे प्रचार साहित्य नव्हते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2019 9:54 pm

Web Title: sharad pawar should explain his role in article 370 says vinod tawde
Next Stories
1 पंतप्रधान मोदींच्या बायोपिकनंतर नमो टिव्हीवरही निवडणूक आयोगाची बंदी
2 …तर निम्मी काँग्रेस, राष्ट्रवादी शिल्लक राहिली नसती : फडणवीस
3 भाजपा-शिवसेना मेळाव्यात राडा; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना धक्काबुक्की
Just Now!
X