News Flash

शरद पवार तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं ? – अमित शाह

पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ? असा थेट सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बारामती येथील जाहीर सभेमध्ये विचारला.

आम्ही जे केलं त्याचा हिशोब आम्ही दिला. पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ? असा थेट सवाल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बारामती येथील जाहीर सभेमध्ये विचारला. बारामतीमधून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी अमित शाह शुक्रवारी बारामतीमध्ये आले होते.

भाजपाने महाराष्ट्रामध्ये काय, काय विकास काम केली आणि भविष्यात करण्याची योजना आहे त्याची माहिती दिली. आमच्याकडे कोणी हिशोब मागितले नव्हता. पण आम्ही तो दिला. पण पवारांनी बारामती, पुणे आणि महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं ?

सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही. त्यांना कुटुंबाशिवाय काहीही दिसत नाही. महाराष्ट्राला तुम्ही काय दिलंत त्याचा हिशोब द्या असा सवाल अमित शाह यांनी पवारांना विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 8:02 pm

Web Title: sharad pawar what you did for maharashtra amit shah
Next Stories
1 भाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक – धनंजय मुंडे
2 एक बार फिरसे, रक्षा खडसे; रावेरकरांचा नारा
3 मागच्या पाच वर्षात १५०० कायदे रद्द केले – पंतप्रधान मोदी
Just Now!
X