26 February 2020

News Flash

अरे नालायका, मग कोणाला मत देऊ?, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा

युतीला संपवण्यासाठी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकले होते तो ओवैसी तुम्हाला चालणार आहेत का ?

संग्रहित छायाचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना रोखण्यासाठी भाजपाला मत देऊ नका, असा प्रचार केला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेतला आहे. जे तुम्हाला सांगत आहेत ना तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ, असे सांगत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी भाषणात राज ठाकरेंचा उल्लेख करणे टाळले असले तरी या विधानाद्वारे त्यांनी राज यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकमध्ये प्रचारसभा घेतली.  यासभेत त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर हल्लाबोल केला. “जवान सीमेवर लढतायंत. सत्तेवर जर नेभळट सरकार आले तर परिस्थिती बिघडेल. नेतृत्व कचखाऊ असेल तर सैन्य काही करु शकत नाही. आदेश मिळाले नाही तर सैन्यदेखील काही करु शकत नाही”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शरद पवार यांनी राजीव गांधी यांना देखील दगा दिला होता. त्यावेळी विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते, मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. कुठे गेला हिमालय ? कुठे गेले ते काळे तोंड.?, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारला.

सभेत त्यांनी राज ठाकरे यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, जे तुम्हाला सांगत आहेत ना तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ.  युतीला संपवण्यासाठी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकले होते तो ओवैसी तुम्हाला चालणार आहेत का ? ओवैसीचा पक्ष हा निजामाला पाठिंबा देण्यासाठी उदयास आला. एक औरंगजेब आम्हालासुद्धा जवळचा वाटतो. पण तो औरंगजेब नावाचा एक सैनिक होता. तो मुसलमान होता पण देशासाठी लढत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. जो या देशाला आपला देश मानतो तो धर्माने कोणताही असो तो आमचा आहे, असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.

First Published on April 25, 2019 10:11 am

Web Title: shiv sena party chief uddhav thackeray jibe at mns chief raj thackeray
Next Stories
1 जम्मू- काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
2 आता उद्धव ठाकरेंचेही लाव रे तो व्हिडिओ; राहुल गांधींवर साधला निशाणा
3 ‘मोदी सरकार जात नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही’
Just Now!
X