News Flash

शिवसेना आणि भाजपा यांच लव्ह मॅरेज – गुलाबराव पाटील

शिवसेना आणि भाजपा यांच लव्ह मॅरेज आहे. नवरा कोण, नवरी कोण ते नंतर ठरवू. आमचं पहिल्यापासूनच प्रेम आहे.

शिवसेना आणि भाजपा यांच लव्ह मॅरेज आहे. नवरा कोण, नवरी कोण ते नंतर ठरवू. आमचं पहिल्यापासूनच प्रेम आहे. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिकवू नये असं म्हणत राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आमचं काँग्रेस राष्ट्रवादीसारख नाही. परदेशी बाई नको म्हणत पवारांनी राष्ट्रवादीला जन्म दिला. आता त्याच काँग्रेसने दिलेली पप्पी तुम्हाला चालते का? असा खोचक प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी ते आले. मंचावर खुमासदार भाषण करत त्यांनी रक्षा खडसेंनाच मतदान करा असं आवाहन केलं.

सभेकडे जनतेची पाठ
उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. पण या सभेकडे जनतेने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सभा स्थळी निम्म्या खुर्च्या रिकाम्या आहेत. सभा स्थळी सर्वसामान्य नागरिकांऐवजी कार्यकर्त्यांची गर्दी जास्त दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 4:16 pm

Web Title: shivsena bjp is in love marriage gulabrao patil
Next Stories
1 गुगल ट्रेण्डसवरही ‘राज’च; पवार, फडणवीस, उद्धव प्रचंड पिछाडीवर
2 ‘त्या’ वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3 रावेरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत निम्म्या खुर्च्या रिकाम्या
Just Now!
X