15 November 2019

News Flash

मला हटवून सिद्धूंना मुख्यमंत्री व्हायचंय : अमरिंदर सिंग

यासाठी काँग्रेसने सिद्धूंवर कारवाई करायला हवी, अशी मागणीही यावेळी अमरिंदर सिंग यांनी केली.

अमरिंदरसिंग

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापायला लागले आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामधील शीतयुद्ध पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांमुळे समोर आले आहे. दरम्यान, सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचंय, त्यामुळेच ते चुकीची विधानं करीत असल्याचा आरोप अमरिंदर सिंग यांनी केला आहे. मात्र, आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले, सिद्धू महत्वाकांक्षी आहेत हे ठीक आहे. लोक महत्वाकांक्षी असतात, मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्यासोबत माझे कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत. मात्र, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा मोठी असल्याने त्यांना माझ्या जागी मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळेच ते चुकीची विधानं करीत आहेत. यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

First Published on May 19, 2019 3:45 pm

Web Title: siddhu probably wants to become cm and replace me that is his business says cm amrinder singh