News Flash

मी पदवीधारक नाही; स्मृती इराणींची कबुली

दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केली नसल्याचे इराणींनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे

स्मृती इराणी, संग्रहित छायाचित्र

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये दिल्ली विद्यापीठातून आपण पदवी पूर्ण केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना इराणी यांनी १९९१ मध्ये दहावी व १९९३ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे नमूद केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या ओपन लर्निंगच्या माध्यमातून तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्याचे इराणी यांनी म्हटले आहे. अमेठी मतदारसंघात इराणी राहूल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये इराणी यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये पदवीधारक असल्याचे म्हटल्याचा दावा विरोधकांनी केला होता आणि त्यावरून गदारोळ उडाला होता. इराणी पदवीधारक नसून त्यांनी ही माहिती खोटी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. इराणी यांनी आपली मालमत्ता ४.७१ कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले आहे. इमारत व जमीन या स्वरूपात २.९६ कोटी रुपयांची तर ठेवी व रोख रकमेच्या व अन्य स्वरूपात एक कोटी ७५ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे.

इराणी यांच्याकडे १३ लाखांची गाडी व २१ लाखांचे दागिने आहेत. त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल नसून त्यांच्या डोक्यावर कर्जही नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. इराणी यांचे पती झुबिन यांच्याकडेही पाच कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 3:23 pm

Web Title: smriti irani says she is not graduate
Next Stories
1 लोकांना शांततेत जगू द्या! अयोध्येत पूजेची संमती मागणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
2 पेंटागॉननं घेतली भारताची बाजू; अवकाशातून धोका असल्यामुळेच केली असणार A-Sat चाचणी
3 ‘डोअर बेल बंद आहे, जोरात मोदी.. मोदी.. ओरडा’; नकोशा उमेदवारांना टाळण्यासाठी भन्नाट शक्कल
Just Now!
X